Home About us Program media blog ask faculty contact
 

मराठीमध्ये 

शास्त्रोक्त (पद्धतशीर) पर्सनल स्वॉट अनालिसिस

S W O T

(Strengths - Weakness - Opportunity - Threats)

Analysis with Scientific Assessment

 

उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी पर्सनल स्वॉट अनालिसिस 

"Chance favors the prepared mind."
– Louis Pasteur

जर तुम्ही तुमच्या गुणांना पूर्ण वाव दिलात तर यशस्वी होऊ शकता. तसेच, जर तुमच्या उणीवांची तुम्हाला कल्पना असेल व तुम्ही त्यांचे तुमच्या कामात व्यवस्थापन केलेत तर तुम्हाला कमी त्रास सहन करावा लागेल. तर तुम्ही तुमच्या बलस्थानांची व उणीवांना कसे ओळखाल व त्यांच्यापुढे येणा-या संधी व धोके यांची कशी चिकित्सा कराल? स्वॉट चिकित्सा (SWOT Analysis)याचसाठी आहे. स्वॉटची खरी ताकद आहे ती अशी की थोड्याशा प्रयत्नांमुळे तुम्हाला अशा अनेक संधी कळतात ज्या एरवी तुमच्या लक्षात आल्याही नसत्या. आणि तुमच्या उणीवा समजल्यानंतर त्यातून निर्माण होऊ शकणा-या धोक्यांना तुम्ही लगाम लावू शकता. तुम्ही स्वतःला जर स्वॉटच्या चौकटीत बसविले तर तुम्ही सहका-यांपेक्षा वेगळे सिद्ध करू शकाल व तुमचे करिअर विकसित करण्यासाठी अधिक कुशल व कुशाग्र होऊ शकाल.

५ मानसिक चाचण्या 
(5 Psychometric Tests)

व्यक्तिमत्व परीक्षा (Personality Test): हे बहुआयामी साधन एक करिअर चाचपणी, जोडीदार समुपदेशन व व्यक्तिमत्व परीक्षण यासाठी वापरले जाते. हे मानसशास्त्रज्ञ व समुपदेशक यांच्याद्वारे व्यक्तिमत्वानुरूप नोकरी/व्यवसाय सांगण्यासाठी वापरले जाते. तसेच काही समस्या ओळखण्यासाठी जसे, काळजी, वर्तन, सामंजस्य, शैक्षणिक, भावनिक व सामाजिक.

वर्तणूक परीक्षण (Behavior Test):  हे एक व्यक्तिमत्व परीक्षणाचे असे साधन आहे ज्यात हे पाहिले जाते की आपण इतरांशी कसे वागतो व इतरांकडून काय अपेक्षा करतो किंवा कशा वर्तनाची अपेक्षा करतो. याचे आकलन आपल्याला स्वतःचे व दुस-यांचे वर्तन समजण्यास मोठी मदत करते. बहुतेक सर्व व्यक्तिमत्व परीक्षणाची साधने ही व्यक्तीच्या गुणावगुणांचे परीक्षण करतात, त्यांच्या संबंधांच्या स्वरूपाचे नाही. परस्पर गरजा व वर्तनावर प्रकाश टाकण्यासोबत ही परीक्षा त्यातील सुधारणा व परिणामकारकता वाढविण्यासाठी काही सूचनाही देते.

व्यक्तिचित्र काढा (Draw A Person Test): व्यक्तिचित्र काढण्याची परीक्षा मॅकओव्हर ने १९४८ मध्ये तयार केली व ती चित्रे परीक्षा देणा-याची काळजी, लहरीपणा, स्वाभिमान व व्यक्तिमत्व कसे व्यक्त करतात याकडे लक्ष देते.

थिमॅटीक ऍपरसेप्शन परीक्षा (Thematic Apperception Test): ही परीक्षा एखाद्या व्यक्तीचे अमूर्त (प्रोजेक्टीव)परीक्षा साहित्याबद्दल विचार, दृष्टीकोन, निरीक्षणशक्ती व भावनिक प्रतिक्रिया तपासते. या परीक्षेतील अमूर्त (प्रोजेक्टीव) परीक्षासाहित्य म्हणजे कार्डांचा एक संच असतो ज्यात विविध आकार व स्थितींतील मानवी आकृत्या असतात.

हस्ताक्षर परीक्षण (Handwriting Analysis: (Graphology)): हस्ताक्षर परीक्षण म्हणजे हस्ताक्षर व व्यक्तिमत्व यांतील संबंधाचा अभ्यास. हस्ताक्षर परीक्षण तुमची अनेक वैशिष्ट्ये जसे चारित्र्य, भावना, प्रज्ञा, सर्जनशीलता, सामाजिक तडजोड, तुमच्या इच्छा, भीती, उणीवा, बलस्थाने व लैंगिक भूक इ. सांगू शकते.

पद्धती

  • आम्ही या परीक्षा घेऊ.
  • प्रत्येक व्यक्तीकडून पर्सनल स्वॉट अनालिसिस करून घेतला जाईल.  . 
  • आम्ही यातील प्रत्येक सहभागी व्यक्तीशी स्वतंत्रपणे समुपदेशन (Counseling)करू.
  • आम्ही यातील सहभागी व्यक्तींच्या विकासासाठी स्वॉट परीक्षणाचा सखोल अहवाल तुम्हाला देऊ.

दिनांक व वेळ:

  • ५ मार्च २०११ शनिवारी संध्याकाळी ४ ते ८
  • ६ मार्च २०११ रविवारी संध्याकाळी ४ ते ८  
  • १ तास स्वतंत्र समुपदेशन. ११, १२ व १३ मार्च २०११  या पैकी एक दिवस. 
  • नियोजन आणि विजन ठरवण्यासाठी ४ तासांचा सत्र १५ मार्च २०११ संद्याकाळी ४ ते ८.

स्थळ:

  • रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी. मुंबई- ४०००२५ 

शुल्क:

  • रुपये ६००० फक्त 
 
 
 
   Copyright © 2009. Haecho Management Studies A group company of SSL Consulting Pvt. Ltd.